Breaking News
Loading...
Thursday, 23 July 2015

Info Post
तांबुस पिवळ्या तुझ्या स्वप्नांत मी हिरवळ होवुन यावं..
हे शक्य आहे का?
काळजात आषाढघन माळून काळ्यामातीत तू
वाट बघत बसावं, आभाळ सजे पर्यंत
सांग हे शक्य आहे का?
अकराव्या दिशेने वाहणारा गारवा..
तू मंजुळ सरींनी - भिजवुन टाकावा..
आणि मी अंगणात विखुरलेली स्वप्ने
गोळा करण्याचा प्रयत्न करावा, रात्र वितळे पर्यंत!
सांग ना हे शक्य आहे का?
ओझरत्या या सहवासात मी पेरावे हे तळहात तुझ्या तळहातांवर, काठोकाठ..
आणि तू डोळे बंद करावे माझ्या पाठोपाठ..
सांग आता हे शक्य आहे का?
चांदण्यांची लगबग सुरु होईन पुन्हा, पुन्हा नवे सुर्य झळकतील..
तू होशील पुन्हा रातराणी.. नव्याने!
पण, तुझा गंध माळणारा रानवारा मीच असेन ना?
सांग ना सांग आता हे शक्य आहे का?
तांबुस पिवळ्या तुझ्या स्वप्नांत मी हिरवळ होवुन यावं..
हे शक्य आहे का?..
Newer Post
Previous
This is the last post.

0 comments:

Post a Comment